MPSC Test Logo mpsctest.in
polity Central Government
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

राज्यसभा सभापतीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?

Which of the following statement is not correct about the Chairman of Rajya Sabha?

पर्याय (Options):
A

राज्यसभा सभापतींना उपराष्ट्रपती पदावरून दूर केले तरच त्यांना सभापती पदावरून दूर करता येते.

B

सभापती हा सभागृहाचा सदस्य नसतो.

C

एखादे विधेयक हे धन विधेयक आहे की नाही हे सभापती ठरवतात आणि त्यांचा निर्णय अंतिम असतो.

अचूक उत्तर (Official Answer)
D

राज्यसभा सभापती दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवत नाहीत.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
विधेयक हे धन विधेयक आहे की नाही हे सभापती ठरवतात आणि त्यांचा निर्णय अंतिम असतो हे योग्य आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • सभापती हे राज्यसभेचे पीठासीन अधिकारी म्हणून ओळखले जातात. • भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. • राज्यसभा सभापतींना उपराष्ट्रपती पदावरून दूर केले तरच त्यांना सभापती पदावरून दूर करता येते. म्हणून, पर्याय (1) योग्य आहे. • लोकसभा अध्यक्ष जो सभागृहाचा सदस्य असतो, त्याप्रमाणे सभापती हा राज्यसभेचा सदस्य नसतो. म्हणून, पर्याय (2) योग्य आहे. • लोकसभा अध्यक्षांना दोन विशेषाधिकार असतात, जे सभापतींना प्राप्त नसतात; ते विशेषाधिकार पुढीलप्रमाणे: • एखादे विधेयक हे धन विधेयक आहे की नाही हे लोकसभेचे अध्यक्ष ठरवतात आणि त्यांचा निर्णय हा अंतिम असतो. म्हणून, पर्याय (3) योग्य नाही. • संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. म्हणून, पर्याय (4) योग्य आहे. • राज्यसभा सभापती, जे भारताचे उपराष्ट्रपती असतात, हे संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवत नाहीत. पूरक माहिती: • जेव्हा उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असतो, अशासमयी ते राज्यसभेच्या बैठकीचे सभापती म्हणून कार्य करू शकत नाहीत. • परंतु त्यांना सभागृहात उपस्थित राहून आपले मत मांडू शकतात; तसेच मतदानाशिवाय ते कामकाजात भाग घेऊ शकतात. • लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव लोकसभेत विचाराधीन असल्यास ते पहिल्यांदा मतदान करू शकतात. • सभापती पहिल्यांदा मतदान करू शकत नाहीत; परंतु केवळ समान मते पडल्यास ते मतदान करू शकतात.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट-क — १००-प्रश्न संपूर्ण सराव मॉक टेस्ट 01

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):