MPSC Test Logo mpsctest.in
History Socio - Religious Reform Movements in the 19th and 20th CE India
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ आणि पश्चिम भारत औद्योगिक संघटना या संस्थांची स्थापना कोणी केली होती?

Who founded the organizations Marathi Granthotjeka Mandal and Paschim Bharat Industrial Association?

पर्याय (Options):
A

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

अचूक उत्तर (Official Answer)
B

नामदार गोपाळ कृष्ण गोखले

C

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

D

गोपाळ गणेश आगरकर

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे: • जन्म 1842 मध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झाला होता. • न्या. रानडे रानडे यांनी महाराष्ट्रात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला. • पुणे शहरात स्थापन झालेल्या प्रत्येक संस्थेशी त्यांचा संबंध होता. • सार्वजनिक सभा, वकृत्वोत्तेजक सभा, लवाद कोर्ट, औद्योगिक परिषद, फिमेल हायस्कूल, फर्ग्युसन कॉलेज, सब जज्जांची परिषद, प्रार्थना समाज, वसंत व्याख्यानमाला, मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ, म्युझियम व पुना मर्कंटाईल बँक या त्यापैकीच काही संस्था आहेत. • मराठी ग्रंथात्तेजक मंडळी: • न्या. रानडे यांनी 'मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी' ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला. • इतिहास, शास्त्रे, देशाची सुधारणा, उपयुक्त कथा आणि धर्माच्या संदर्भातील पुस्तके प्रसिद्ध करणे हा या संस्थेचा उद्देश होता. • रावजीशास्त्री गोडबोले, कृष्णशास्त्री चिपळूणकर व कृष्णशास्त्री तळेकर हे तिघेजण पुस्तक पसंत करण्याच्या समितीचे सदस्य होते. • या संस्थेने पुणे येथे ग्रंथकारांचे संमेलन आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता. • 800 लोक या संस्थेचे वर्गणीदार होते; परंतु प्रत्यक्षात दोन टक्के लोकांनीच वर्गणी भरलेली होती. • औद्योगिक चळवळीला प्रोत्साहन: • न्या. रानडे यांनी राजकारणास अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली. • त्यांनी हिंदी राजकारणाचा व औद्योगिक उन्नतीच्या चळवळीचा पाया घातला. • 1889 मध्ये त्यांनी पश्चिम भारत औद्योगिक संघटना या संस्थेची स्थापना केली. • त्यांनी देशाच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी इ. स. 1890 मध्ये औद्योगिक परिषदेचा उपक्रम सुरू केला. • प्रत्येक देशातील परिस्थितीप्रमाणे त्या देशाचे स्वतंत्र अर्थशास्त्र बनते, हे रानडे यांनी सिद्ध केले. • रानडेंची पुस्तके: • राईज ऑफ मराठा पॉवर • मिसेलनेअस राईटींग ऑफ मिस्टर जस्टिस रानडे • एसेज इन इंडियन इकॉनॉमिक्स बाय एम. जी. रानडे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

History MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा नव्हत्या? 1. सरोजिनी नायडू 2. ॲनी बेझंट 3. नेली सेनगुप्ता 4. कमलादेवी चट्टोपाध्याय खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा.

History MPSC सराव प्रश्न

राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या: I. त्यांच्या मनात पौर्वात्य पारंपरिक तत्त्वज्ञान पद्धतींबद्दल नितांत प्रेम आणि आदर होता. II. आपल्या देशवासियांनी बुद्धिप्रामाण्यवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच सर्व स्त्री-पुरुषांची मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक समतेचे तत्त्व स्वीकारावे, अशी त्यांची इच्छा होती. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने अचूक आहे/आहेत?

History MPSC सराव प्रश्न

सालबाईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला?

History MPSC सराव प्रश्न

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात "पूर्ण स्वराज" चा ठराव मंजूर करण्यात आला?

History MPSC सराव प्रश्न

पुढीलपैकी कोणत्या शासकाने जिटल म्हणून तांब्याची नाणी जारी केली होती?