MPSC Test Logo mpsctest.in
History The Great Revolt of 1857
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

1857 च्या उठावासाठी फाशी देण्यात आलेला पहिला सैनिक कोण होता?

Who was the first soldier to be hanged for the 1857 revolt?

पर्याय (Options):
A

मंगल पांडे

अचूक उत्तर (Official Answer)
B

महादजी शिंदे

C

शाहूजी

D

बटुकेश्वर दत्त

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
1857 चा उठाव हा इंग्रजांच्या वसाहतवादी निरंकुश शासनाविरूद्ध स्वातंत्र्यलढ्याची जाणीवपूर्वक सुरुवात होती. • 1857 च्या उठावाची विविध नावे आहेत – भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध, शिपायांचा विद्रोह, इ. • त्या उठावाची सुरुवात ब्रिटीश अधिकांऱ्यांविरुद्ध बंगाल प्रेसीडेंसीमध्ये शिपाह्यांनी केली होती. • या स्वातंत्र्य युद्धाने ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभाराचा अंत केला. 1857 च्या उठावासाठी फाशी देण्यात आलेला पहिला सैनिक मंगल पांडे होता. • तो ब्रिटीश सैन्यात एक भारतीय सैनिक होता आणि असे मानण्यात येते की, तो 1857 मधील शिपायांच्या उठावामागे किंवा भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धामागे महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहे. • दोन ब्रिटीश सैनिकांवर हल्ला केल्यामुळे मंगल पांडे यांना वयाच्या 29 व्या वर्षी 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आली. • 29 मार्च 1857 रोजी, 34 व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री (बी.एन.आय.) चा शिपाई असलेल्या मंगल पांडे यानी ईस्ट इंडिया कंपनीच्या कमांडिंग अधिकाऱ्याविरूद्ध बंड केले. • या घटनेनंतर आणि मंगल पांडेला झालेल्या शिक्षेमुळे बंगाल सैनिकांमधील रागाचा उद्रेक होऊन 1857 चा उठाव झाला. • मंगल पांडे याचा उठाव थेट 1857 च्या बंडाला कारणीभूत ठरला नाही पण यामुळे भारतीय शिपायांच्या मनातील इंग्रजी अधिकाऱ्यांविरुद्ध असलेल्या रागाला आणि निराशेच्या भावनेला तीव्र केले. • 1761 मध्ये पानिपतच्या विनाशकारी तिसर्‍या युद्धानंतर मराठा सत्तेला पुन्हा उभे करण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी श्रीमंत महादजी शिंदे प्रसिद्ध होते. • बी के दत्त म्हणून ओळखले जाणारे बटुकेश्वर दत्त हे क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानी होते. 1929 च्या केंद्रीय विधानसभेच्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात सहभागी होते आणि 20 जुलै 1965 रोजी वयाच्या 54 व्या वर्षी आजाराने निधन झाले.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

History MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा नव्हत्या? 1. सरोजिनी नायडू 2. ॲनी बेझंट 3. नेली सेनगुप्ता 4. कमलादेवी चट्टोपाध्याय खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा.

History MPSC सराव प्रश्न

राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या: I. त्यांच्या मनात पौर्वात्य पारंपरिक तत्त्वज्ञान पद्धतींबद्दल नितांत प्रेम आणि आदर होता. II. आपल्या देशवासियांनी बुद्धिप्रामाण्यवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच सर्व स्त्री-पुरुषांची मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक समतेचे तत्त्व स्वीकारावे, अशी त्यांची इच्छा होती. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने अचूक आहे/आहेत?

History MPSC सराव प्रश्न

सालबाईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला?

History MPSC सराव प्रश्न

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात "पूर्ण स्वराज" चा ठराव मंजूर करण्यात आला?

History MPSC सराव प्रश्न

पुढीलपैकी कोणत्या शासकाने जिटल म्हणून तांब्याची नाणी जारी केली होती?