MPSC Test Logo mpsctest.in
economy Initiatives by Government
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

तेंडुलकर समितीचा वापर करून नियोजन मंडळाने 2011-12 साठी दारिद्रयाचे प्रमाण मोजले त्यात सर्वाधिक दारिद्रयाचे प्रमाण कोणत्या राज्य/केंद्रशासित परदेशात आढळून आले.

Using the Tendulkar Committee, the Planning Board measured the poverty rate for 2011-12 in which state/UT had the highest poverty rate.

पर्याय (Options):
A

झारखंड

B

बिहार

C

चांदीगड

अचूक उत्तर (Official Answer)
D

मणीपुर

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
चांदीगड बरोबर उत्तर आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: 2011-12साठी दारिद्रयाचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य/के प्र. 1. चंदिगड (39.9%) 2.दा.न.हवेली (39.3%) 3. झारखंड (37.0%) 4. मणीपूर (36.9%) 5. अरू. प्रदेश (34.7%) 2011-12 साठी गरीब लोकांची सर्वाधिक संख्या असलेले राज्य. 1. उत्तर प्रदेश (598.2 लाख) 2. बिहार (358.2 लाख) 3. मध्यप्रदेश (234.1 लाख) 4. महाराष्ट्र (197.9 लाख) 5. प. बंगाल (185.0 लाख) पूरक माहिती: सुरेश तेंडुलकर समिती : • केंद्रीय नियोजन मंडळाने या समितीची स्थापना नोव्हेंबर 2009 मध्ये केली, व तिने आपला अहवाल 8 डिसेंबर, 2009 रोजी सादर केला. या समितीच्या महत्वाच्या शिफारसी पुढीलप्रमाणे- • समितीने दारिद्रय रेषा मोजण्यासाठी कॅलरीच्या निकषाचा वापर सोडून देण्याची शिफारस केली आहे, कारण समितीच्या मते कॅलरी उपभोग व पोषण यांमध्ये कमी परस्परसंबंध आहे. • समितीने दारिद्रय रेषेच्या मोजमापासाठी नवीन पद्धत सुचविली आहे, ज्यामधे आरोग्य व शिक्षणावरील खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच शहरी दारिद्रय रेषेलाच इतर दारिद्रय रेषांचा आधार मानण्याचीहि शिफारस समितीने केली आहे. • तेंडुलकर समितीने नवीन निकषांच्या आधारावर 2004-05 साठी ग्रामीण भागासाठी 446.68 रु., तर शहरी भागासाठी 578.8 रु. अशी दारिद्रय रेषा सुचविली आहे. • या दारिद्रय रेषेच्या आधारावर समितीने देशातील दारिद्रयाचे प्रमाण 37.2 टक्के, ग्रामीण भागात 41.8 टक्के तर 25.7 टक्के इतके असल्याचे संगितले आहे. • नियोजन मंडळाने तेंडुलकर समितीने शिफारस केलेल्या दारिद्रय रेषेच्या मोजमाप पद्धतीचा स्विकार केला. या पद्धतीनुसार, दारिद्रय रेषा शहरासाठी 28.65 रु. प्रति दिन उपभोग खर्च, तर ग्रामीण भागासाठी 22.42 रु. प्रति दिन उपभोग खर्च, इतकी ठरविण्यात आली.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram

Solution Diagram

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

economy MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणत्या MSMEs श्रेणीमध्ये उद्यम नोंदणी पोर्टलवरील MSME नोंदणीचा सर्वात मोठा वाटा येतो?

economy MPSC सराव प्रश्न

1991 च्या सुधारणांनी उद्योगांचे निर्गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिले होते. 1991 नंतरच्या सुधारणांनंतर कोणता उद्योग सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आला आहे?

economy MPSC सराव प्रश्न

जागतिकीकरणामुळे BPO उद्योगाचा उदय झाला. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगचे (BPO) मुख्य वैशिष्ट्य काय आहे?

economy MPSC सराव प्रश्न

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?

economy MPSC सराव प्रश्न

जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान, नियतकालिक श्रमदल सर्वेक्षणानुसार भारतातील बेरोजगारीचा दर किती होता?