सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर पर्याय 4 आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
गोपाळ हरी देशमुख (1823-1892):
• महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून लोकहितवादींना ओळखले जाते.
• लोकहितवादींचे नाव गोपाळ हरी देशमुख असे होते. त्यांचा जन्म इ. स. 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुणे येथे झाला.
• इंग्रजी, संस्कृत, फारसी, गुजराथी, हिंदी इ. भाषा त्यांनी आत्मसात केल्या. दुभाषी या पदावर ते नियुक्त झाले.
• पुढे शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम कमिशनर, जज्ज आदी पदांवर त्यांनी काम केले.
• त्यांना सरकारने 'रावबहादूर' ही पदवी दिली होती.
• लोकहितवादी अनेक पदे व पदव्या शासनाकडून व लोकांकडून मिळवून सन्मानित झाले.
• भाऊ महाजन यांच्या 'प्रभाकर' मध्ये त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला 'शतपत्रे' असे म्हणतात.
• त्यातून त्यांचा पुरोगामी दृष्टिकोन व समाजहिताविषयीची कळकळ दिसून येते.
• 'लक्ष्मीज्ञान', 'गीतातत्व', 'जातिभेद', 'भरतखंडपर्व', 'भिक्षुक', 'लंकेचा इतिहास', 'ऐतिहासिक गोष्टी', 'पानिपतची लढाई', 'कलियुग' आदी ग्रंथांचे लेखन केले.
• लोकहितवादी द्रष्टे विचारवंत होते. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, खुळ्या समजुती इत्यादींवर त्यांनी सडेतोड विचार समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व यावर त्यांनी हल्ला केला. स्त्रियांच्या समानतेचे विचार त्यांनी मांडले.
• भारतीय समाजाची जातिव्यवस्थेमुळे अधोगती झाली आहे यावर लोकहितवादींनी जोरदार टीका केली.
• उच्चवर्णीयांनी आपल्या वर्ण श्रेष्ठत्वाचा त्याग करून समाजहितासाठी नवीन आचारविचाराचा स्वीकार करावा असा त्यांनी आग्रह धरला.
• समाजाची प्रगती होण्यासाठी इंग्रजी विदया, भौतिकशास्त्राचे ज्ञान, आधुनिक उदयोगधंदे यांचा त्यांनी आग्रह धरला.
• केवळ आणि धार्मिक सुधारणा करून देशाचा सर्वांगीण विकास होणार नाही तर या सुधारणाशिवाय देशाला राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले पाहिजे असा विचार गोपाळरावांनी प्रस्तुत केला.
• या ध्येय पूर्ततेसाठी जनतेने देशातील परकीय सत्ता हाकलून लावण्यासाठी आणि स्वतःचा राजकीय हक्क मिळविण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे असा गोपाळरावांनी जनतेसमोर विचर मांडला. म्हणून विधान (b) बरोबर आहे.
लक्षात ठेवण्याजोगा मुद्दा:
• नाना शंकरशेठ महाराष्ट्रात मॉरिशस मधून उसाचे बेणे प्रथम आयात केले. म्हणून विधान (c) चुकीचे आहे.
• विष्णू शास्त्री पंडित यांनी इंदूप्रकाश हे साप्ताहिक सुरू केले होते. गोपाळ हरी देशमुख यांनी या सप्ताहिकामधून लेखन केले होते. म्हणून विधान (a) चुकीचे आहे.
• ज्ञानोदय हे अहमदनगर येथून प्रकाशित होणारे वृत्तपत्र होते.
• हे वृत्तपत्र 1843 साली सुरू झाले.
• अमेरिकन मराठी मिशनने याची सुरुवात केली.
• ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा याचा मुख्य उदेश होता.
The correct answer is Option 4.
Explanation & Key Takeaways:
Gopal Hari Deshmukh (1823-1892):
• philanthropist are recognized as pioneers in the field of religious education in Maharashtra.
• The name of the philanthropist was Gopal Hari Deshmukh. He was born on 18 February 1823 AD in Pune.
• He learned English, Sanskrit, Persian, Gujarati, Hindi and other languages. He was appointed as an interpreter.
• Later he worked in the positions of Shirastedar, Munsaf, Inam Commissioner, Judge etc.
• He was given the title 'Rao Bahadur' by the government.
• The philanthropists were honored by getting many positions and titles from the government and the people.
• In Bhau Mahajan's 'Prabhakar', the writings he addressed to the Hindu society are called 'Shatapatre'.
• It shows his progressive attitude and his concern for social welfare.
• Wrote books like 'Lakshmijnana', 'Gitatva', 'Jatibhed', 'Bharatkhand Parva', 'Bhikshuka', 'History of Lanka', 'Historical Things', 'Battle of Panipat', 'Kali Yuga' etc.
• The philanthropist was a visionary thinker. He attacked the undesirable customs, traditions, superstitions, open beliefs etc. in the society, child marriage, dowry, polygamy in the society. He presented the ideas of women's equality.
• The philanthropists strongly criticized the degradation of Indian society due to the caste system.
• He insisted that the upper castes should give up their caste superiority and adopt a new way of thinking for the welfare of the society.
• He insisted on English education, knowledge of physics, modern industries for the progress of the society.
• Gopalrao presented the idea that the overall development of the country will not be achieved only through religious reforms, but without these reforms, the country should gain political independence.
• To achieve this goal, Gopal Rao told the public that the people should strive to oust the foreign power in the country and get their own political rights. Hence statement (b) is correct.
Common Pitfalls:
• Nana Shankarsheth first imported sugarcane from Mauritius to Maharashtra. Hence statement (c) is incorrect.
• Induprakash was started by Vishnu Shastri Pandit as a newspaper. Gopal Hari Deshmukh wrote from this newspaper. Hence statement (a) is incorrect.
• Gyanodaya was a newspaper published from Ahmednagar.
• This newspaper was started in the year 1843.
• It was started by the American Marathi Mission.
• Its main aim was to spread Christianity.