MPSC Test Logo mpsctest.in
Geography Indian Economic and Human Geography
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, पुढीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्त्रियांची लोकसंख्या ही पुरुषांपेक्षा अधिक आहे?

As per the 2011 Census data, in which of the following union territories the female population outnumbers the male population?

पर्याय (Options):
A

चंदीगड

B

लक्षद्वीप

C

अंदमान व निकोबार

D

पुडुचेरी

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर पुडुचेरी आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: पुडुचेरी • सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा केंद्रशासित प्रदेश (1037 स्त्रिया/1000 पुरुष). • 1962 मध्ये, पाँडिचेरी एक केंद्रशासित प्रदेश बनला. • 2006 मध्ये, पाँडिचेरी हे नाव बदलून पुडुचेरी असे करण्यात आले. • राजधानी - पुडुचेरी • नायब राज्यपाल - तमिळीसाई सौंदराजन • असा केंद्रशासित प्रदेश जिथले लोक फ्रेंच भाषिक आहेत. • विधानसभेची स्थापना करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश. • पुडुचेरीमध्ये पुडुचेरी, कराईक्कल (तामिळनाडू), यानम (आंध्रप्रदेश), माहे (केरळ) असे चार जिल्हे आहेत. • माहे हा भारतातील सर्वात लहान जिल्हा आहे. • केरळमधील ब्रिटीश आणि फ्रेंचांनी व्यापलेल्या प्रांतांना वेगळे केल्यामुळे मय्याझी नदी (माहे नदी) "इंग्लिश खाडी" म्हणून ओळखली जाते. • पुडुचेरी आणि यानम बंगालच्या उपसागराला लागून व माहे अरबी समुद्राला लागून वसलेले आहेत. पूरक माहिती: लक्षद्वीप • लक्षद्वीप हा भारताचा सर्वात छोटा केंद्र शासित प्रदेश आहे. • लक्षद्वीपचे जुने नाव लॅकॅडिव असे होते. • 1 नोव्हेंबर 1973 ला लक्षद्वीपला अधिकृत नाव मिळाले. • राजधानी - कावरत्ती • नायब राज्यपाल - प्रफुल्ल पटेल • लक्षद्वीपची पूर्वीची राजधानी कोझिकोडे होती. 1964 मध्ये राजधानी कावरत्ती येथे हलविण्यात आली. • लक्षद्वीप हा सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश आहे. • लक्षद्वीप केरळ उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येते. अंदमान व निकोबार • राजधानी - श्रीविजय पुरम • नायब राज्यपाल - अ‍ॅडमिरल डी. के. जोशी • किमान लोकसंख्या घनता असलेला केंद्रशासित प्रदेश. • बॅरेन आयलँड हा अंदमानमधील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी आहे. • सॅडल पीक हे अंदमानमधील सर्वोच्च शिखर आहे. • दहा-डिग्री चॅनेल हे अंदमान निकोबार बेटांना विलग करणारे चॅनेल आहे. • अंदमान व निकोबार बेटे कोलकाता उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येतात. • वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पोर्ट ब्लेअर येथे आहे. • 1906 मध्ये, ब्रिटिशांनी बांधलेले सेल्युलर जेल हे कालापानी म्हणून देखील ओळखले जाते. चंदीगड • चंदीगड ही पंजाब व हरियाणा या दोन राज्यांची राजधानी आहे. • नायब राज्यपाल - श्री. बनवारीलाल पुरोहित • चंदीगड हे 'सुंदर शहर' म्हणून देखील ओळखले जाते. • पंजाब व हरियाणा येथील सामाईक उच्च न्यायालय चंदीगडमध्ये आहे. • चंदीगड हे भारतातील पहिले धुर- मुक्त शहर आहे. • चंदीगडमध्ये भारताच्या पहिल्या रॉक गार्डनची स्थापन झाली होती. • झाकिर हुसेन गुलाब बाग, आशियातील सर्वात मोठी गुलाबाची बाग, चंदीगडमध्ये आहे. महत्त्वाची टीप: • सर्वात मोठा केंद्र शासित प्रदेश: लडाख • सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश: दिल्ली • किमान लिंग गुणोत्तर असलेला केंद्रशासित प्रदेश: दमण व दीव • किमान साक्षर असलेला केंद्रशासित प्रदेश: दमण व दीव
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Geography MPSC सराव प्रश्न

पुढील विधाने वाचा: विधान 1: वातावरणाच्या उभ्या उष्णतेला अभिक्रमण असे म्हणतात. विधान 2: हवेच्या क्षैतिज हालचालीद्वारे उष्णतेचे हस्तांतरण संवहन म्हणतात. विधान 3: उन्हाळ्यात उत्तर भारतातील ‘लू’ वारे अभिक्रमणामुळे होतात. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

Geography MPSC सराव प्रश्न

मातीतील घटकांमध्ये खनिजांचे सरासरी प्रमाण किती टक्के असते?

Geography MPSC सराव प्रश्न

संयुक्त राष्ट्र सागरी कायद्याच्या अधिवेशनानुसार (UNCLOS), भारताचा अनन्य आर्थिक क्षेत्र (EEZ) __________ पर्यंत पसरलेला आहे.

Geography MPSC सराव प्रश्न

पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात विक्षोभ निर्माण होण्यास कोणते सौर घटक जबाबदार आहेत?

Geography MPSC सराव प्रश्न

द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे?