MPSC Test Logo mpsctest.in
Economy National Income Accounting
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालीलपैकी कोणती पद्धत राष्ट्रीय उत्पन्नाच्या अंदाज पद्धतींपैकी एक नाही?

Which of the following is NOT one of the methods of national income estimation?

पर्याय (Options):
A

बँकिंग पद्धत

अचूक उत्तर (Official Answer)
B

खर्च पद्धत

C

उत्पाद पद्धत

D

उत्पन्न पद्धत

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
बँकिंग पद्धत हे योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • एका आर्थिक वर्षात देशांतर्गत निर्माण होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे एकूण मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. • राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती: • खर्च पद्धत- एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये करण्यात आलेला एकूण खर्चाचा अंदाज या पद्धतींतर्गत काढला जातो. • उत्पन्न पद्धत- या पद्धतीनुसार, एका आर्थिक वर्षात देशातील कुटुंबसंस्थांनी उत्पादक सेवांसाठीचे भाडे, मजुरी, व्याज आणि नफा या स्वरूपात उत्पादनाच्या प्राथमिक घटकांना दिलेल्या देयकांच्या बाजूने कामावलेले एकूण राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. • उत्पाद पद्धत- या पद्धतीनुसार, राष्ट्रीय उत्पन्न हे वस्तू व सेवांचा प्रवाह म्हणून मोजले जाते. या पद्धतीला निष्पादन पद्धत असेही म्हणतात. पूरक माहिती: • स्थूल देशांतर्गत उत्पाद (GDP): एका आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत उत्पादन होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे एकूण बाजारमूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद होय. • स्थूल राष्ट्रीय उत्पाद (GNP): एका आर्थिक वर्षात देशाच्या नागरिकांनी उत्पादन केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे एकूण बाजारमूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पाद होय. • निव्वळ देशांतर्गत उत्पाद (NDP): GDP - भांडवली घसारा • राष्ट्रीय उत्पन्न (NI): एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित सर्व वस्तू व सेवांचे एकूण मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. • NI = NDP - निव्वळ परकीय घटक उत्पन्न - परदेशामध्ये देशातील नागरिकांनी कमावलेले उत्पन्न - अप्रत्यक्ष व्यवसाय कर. • वैयक्तिक उत्पन्न (PI): देशातील नागरिकांनी मिळविलेले एकूण उत्पन्न (हस्तांतरण देयकांसह) • PI = NI - कमावलेले पण प्राप्त नसलेले उत्पन्न - सरकारी रोख्यांमधून मिळणारे व्याज. • व्ययक्षम उत्पन्न (DI) = PI - आयकर.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Economy MPSC सराव प्रश्न

भारतातील थेट कराचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे?

Economy MPSC सराव प्रश्न

भारतीय राज्यघटनेतील पंचवार्षिक योजनांची संकल्पना _______ पासून घेतली आहे.

Economy MPSC सराव प्रश्न

अमेरिकेसोबत भारताच्या अलीकडील LPG (घरगुती गॅस) आयात करारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या: I. अमेरिकेकडून LPG आयात करण्याचा पहिला दीर्घकालीन करार भारताने केला आहे. II. या नवीन करारानुसार भारत सध्या त्याच्या एकूण वार्षिक LPG गरजेच्या सुमारे 10% आयात अमेरिकेकडून करतो. दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

Economy MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती संकल्पना निव्वळ देशांतर्गत उत्पादाचे (NDP) उत्तम प्रतिनिधित्व करते?

Economy MPSC सराव प्रश्न

पुढीलपैकी कोणता उद्योग भारताच्या आठ मोठ्या उद्योगांचा भाग नाही?